मला सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला; संजय राऊतांचा हल्लाबोल

मला सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला; संजय राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: May 07, 2024 | 1:07 PM

बारामती आम्ही जिंकू...या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने सुप्रियाताई सुळे जिंकतील, असा विश्वासही यावेळी संजय राऊतांनी व्यक्त केला. राऊत म्हणाले, मला सुनेत्रा पवार यांची दया येते, त्यांच्याविषयी मला वाईट वाटतंय कारण... संजय राऊतांचा हल्लाबोल काय?

सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांनी बळीचा बकरा केला आहे, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. तर बारामती आम्ही जिंकू…या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने सुप्रियाताई सुळे जिंकतील, असा विश्वासही यावेळी संजय राऊतांनी व्यक्त केला. राऊत म्हणाले, मला सुनेत्रा पवार यांची दया येते, त्यांच्याविषयी मला वाईट वाटतंय कारण त्यांच्या पतीने, अजित पवार यांनी त्यांचा बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांचं काम सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान खासदार आता पुन्हा लोकसभेत दिसणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे असं म्हणत भाजपचा पराभव निश्चित आहे, पराभवाच्या छायेत भाजप आहे, असेही संजय राऊत यांनी म्हणत भाजपवर हल्ला चढवला. बघा काय म्हणाले संजय राऊत?

Published on: May 07, 2024 01:07 PM