‘दादा आवाज येत नाही’, अजित पवारांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, नेहमीच्या स्टाईलने दिलं उत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यात अजित पवार यांच्या आज 4 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आलंय. अजित पवार सभेत भाषण करत असताना कार्यकर्त्यांनी सांगितले, 'दादा आवाज येत नाही', यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. बघा दादा काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. तसंच अजित पवार यांची भाषणाची स्टाईल देखील इतर राजकीय नेत्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. आपल्या अनोख्या भाषणाच्या स्टाईने अजित पवार यांची सोशल मीडियावरही तरूणांमध्ये क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यात अजित पवार यांच्या आज 4 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आलंय. भिगवण, पळसदेव , काटी आणि बावडा येथे जाहीर सभा होणार आहेत. दरम्यान, भिगवण येथील सभेत अजित पवारांनी नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार सभेत भाषण करत असताना कार्यकर्त्यांनी सांगितले, ‘दादा आवाज येत नाही’, यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. बघा दादा काय म्हणाले?