मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवार यांच्या घरी, नेमकं कारण काय? ताई म्हणाल्या…
आज बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढत होतेय. दरम्यान, एकीकडे बारामतीत मतदानाची प्रक्रिया सुरू आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे हे अचानक अजित पवार यांच्या बंगल्यावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. नेमकं कारण काय? कोणाची घेतली भेट?
राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून यामध्ये ११ मतदारसंघात लोकसभेचं मतदान पार पडतंय. यामध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. आज बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढत होतेय. दरम्यान, एकीकडे बारामतीत मतदानाची प्रक्रिया सुरू आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे हे अचानक अजित पवार यांच्या बंगल्यावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या परिवाराने मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे या थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या. साधारण पाच मिनिटे त्या बंगल्यावर होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. या अवघ्या काही मिनिटांच्या सुप्रिया सुळेंच्या भेटीने चांगली चर्चा सुरु झाली आहे. सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी मंगळवारी ११ वाजेच्या सुमारास आल्या होत्या. त्यावेळी घरात अजित पवार होते. परंतु सुनेत्रा पवार नव्हत्या. त्या काकींची भेट घेण्यासाठी आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांची आणि अजित पवार यांच्याशी काही चर्चा झाली नाही. त्या फक्त त्यांच्या काकी आशाताई पवार यांनाच भेटल्या असल्याचे त्यांनी सांगितले.