लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या जाहीरसभांचा धडाका?
मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाचा आज शेवटचा दिवस असल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे पाहायला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावणार आहेत. राज्यातील ११ मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाचा आज शेवटचा दिवस असल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे पाहायला मिळणार आहे. राज्यभरात आज नेत्याच्या १३ जाहीर सभा होणार आहेत. पाच ठिकाणी रॅली निघणार आहेत. दरम्यान, बारामतीत अजित पवारांच्या ५ जाहीर सभा तर शरद पवारांच्या ३ जाहीर सभांचं आयोजन आज करण्यात आलंय. आज भोर येथे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवार, नाना पटोले, अमोल कोल्हे, संग्राम थोपटेंच्या सभा, इंदापूर आणि बारामती येथे शरद पवारांची सभा, यासोबतच भोर, वेल्हा, इंदापूर येथे सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा होणार आहे.