Baramati Lok Sabha Constituency : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?
येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. हा निकाल येण्यापूर्वीच काही राजकीय विश्लेषकांनी महायुती की महाविकास आघाडी विजयी होणार यासंदर्भातील आपला-आपला अंदाज वर्तविला आहे. तर बारामतीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या सर्वच टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडलं. आता येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. हा निकाल येण्यापूर्वीच काही राजकीय विश्लेषकांनी महायुती की महाविकास आघाडी विजयी होणार यासंदर्भातील आपला-आपला अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत होते, जसे की, बीड लोकसभा मतदारसंघ, अमरावती लोकसभा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघ.. यापैकी बारामतीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभेचा तगडा सामना रंगला… त्यामुळे आता नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागणार? लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे. जाणून घेऊया….
Published on: May 30, 2024 10:15 AM
Latest Videos