सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय…,अजित पवार यांचा कुणावर निशाणा?
बारामतीमध्ये रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी गावा-गावात प्रचार सुरू केलाय आणि पुन्हा अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
अजित पवारांवर प्रचारसभेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. त्यावरून दादांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. बारामतीमध्ये रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी गावा-गावात प्रचार सुरू केलाय आणि पुन्हा अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. न्यू यॉर्कच्या पत्रकारांसमोर शरद पवार कुटुंबाला घेऊन बसायचे आणि आम्ही कसे एकत्र आहोत असे दाखवायचे…असं अजित पवार म्हणाले. इतकंच नाहीतर अजित पवारांनी यावेळी युगेंद्र पवार यांच्या विधानाची समाचार घेतला. बारामतीत शरद पवार यांनी संस्था आणल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले होते. यावर अजितदादा म्हणाले, शरद पवारांनी सगळं केलं मग ३५ वर्ष मी काय केलं? असा सवालही अजित पवार यांनी त्यांच्याच शैलीत विचारला. बघा काय म्हणाले अजित पवार ?