बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हाचा संभ्रम होणार? निवडणूक आयोगानं कुणाला दिलं चिन्ह?
बारामतीप्रमाणे आता शिरूरमध्येही अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. शिरूरमधील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह निवडणूक लढवण्यासाठी आयोगाकडून देण्यात आलंय. बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हाचा संभ्रम होणार?
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती मतदारसंघातील निवडणूक पार पडणार आहे. येत्या ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीमध्ये मतदान होणार आहे. अशातच बारामती मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर काही जण अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढण्यास मैदानात उतरले आहेत. दरम्यान, बारामतीप्रमाणे आता शिरूरमध्येही अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. शिरूरमधील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह निवडणूक लढवण्यासाठी आयोगाकडून देण्यात आलंय. शिरूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना तुतारी वाजवणारा माणूस तर मनोहर वाडेकर यांना तुतारी चिन्ह देण्यात आलंय. त्यामुळे मनोहर वाडेकर हे लोकसभेच्या रिंगणात तुतारी हे चिन्ह घेऊन उतरले आहेत. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात शिरूर येथे मतदार होणार आहे. १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात शिरूरमध्ये मतदार आपल्या उमेदवाराला मतदान देताना दिसतील तर बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हाचा संभ्रम होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.