Baramulla Infiltration 2025 : भारतीय सैन्यदलाच्या जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
Pahalgam Terror Attack Updates : जम्मू काश्मीर येथे बारामुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्लात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. बारामुल्ला येथे असलेल्या नियंत्रण रेषेमधून खुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच वेळी भारतीय सैन्यातील जवानांनी गोळीबार केल्याने यात दोन्ही दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 24 तासही पूर्ण झालेले नाहीत, त्यापूर्वीच आज पहाटेपासून बारामुल्ला भागात संशयित हालचाली लष्कराला दिसून आल्या. त्यांनंतर दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली असल्याचं सैन्याच्या निदर्शनास आलं. त्यामुळे भारतीय सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घुसखोरांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य दलाकडून गेल्या 2 ते 3 तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू होतं. या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे.

पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?

युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश

राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?

'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
