पाडव्यानिमित्त विठुरायाचा गाभारा ५ टन मोसंबीनं सजला, बघा आकर्षक सजावट
आज बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर आकर्षक अशी मोसंबीची आरास, ही सजावट पैठण येथील विठ्ठल भक्त अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे. ही विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातील आकर्षक सजावट तब्बल 9 हजार मोसंबी फळांचा वापर करून केली आहे.
पंढरपूर, १४ नोव्हेंबर, २०२३ | आज बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर आकर्षक अशी मोसंबीची आरास करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आज पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा सुंदर अशा भगव्या, हिरव्या रंगाच्या मोसंबी या फळांचा वापर करून सजवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाच टन मोसंबी या फळाचा वापर करण्यात आला आहे. ही सजावट पैठण येथील विठ्ठल भक्त अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे. ही मोसंबी सजावट मंदिरातील सोळखांबी, बाजीराव पडसाळी, प्रवेशद्वाराची तोरणे या ठिकाणी करण्यात आली आहे. ही आकर्षक सजावट तब्बल 9 हजार मोसंबी फळांचा वापर करून केली आहे. त्यामुळे हे मंदिर अधिकच आकर्षक दिसत आहे तर विठ्ठलाला पिस्ता रंगाचा अंगरखा आणि केसरी रंगाचे धोतर तर रुक्मिणी मातेला जांभळ्या रंगाची पैठणी परिधान केल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.