कोरोना संसर्ग वाढत असल्यानं एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावरून हटवलं

कोरोना संसर्ग वाढत असल्यानं एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावरून हटवलं

| Updated on: Jan 01, 2022 | 8:27 PM

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वाढत आहे. राज्यात काल 8 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वाढत आहे. राज्यात काल 8 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे पाच हजाराच्या घरात रुग्ण आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा फटका आता एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) बसतोय. आझाद मैदानावर (Azad Maidan) मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार या कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेसाठी आझाद मैदान सोडावं लागणार आहे.