Special Report | मनीषा कायंदे शिवसेनेत, अंबादास दानवे यांना धक्का? विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार?
विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे दोन पेच निर्माण झाले आहेत. पुन्हा एकदा अपात्रतेच्या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या संख्याबळावर देखील परिणाम झालेला आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.
मुंबई : विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे दोन पेच निर्माण झाले आहेत. पुन्हा एकदा अपात्रतेच्या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या संख्याबळावर देखील परिणाम झालेला आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. कारण ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 तर काँग्रेसची 8 आहे. त्यात अजित पवार यांनी देखील आम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र तांत्रिदृष्ट्या बाजोरिया, कायदेंनी शिवसेना सोडल्याचं अद्याप कळवलं नाही आहे, त्यामुळे संख्याबळ आमचं जास्त असल्याचं दानवे म्हणाले आहेत.त्यामुळे आता मनीषा कायंदेंचं काय होणार? तसंच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून पुढे काय काय घडणार? यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…