नर्सेस ‘लाडक्या बहिणी’ नाहीत का? कुठे होतेय अनोखी बॅनरबाजीची चर्चा?
नर्सेस लाडक्या बहिणी नाहीत का? असा सवाल करणारे बॅनर सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. बीडमध्ये नर्स संघटनेकडून अणुच्या पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेपूर्वीच अशी बॅनरबाजी नर्सेसकडून करण्यात आली आहे.
राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. अशातच लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी आजही महिलांची कागदपत्रांची जमावाजमव असुदे किंवा आधार बँक खात्याशी लिंक करणं असूदे याची धावपळ सुरू आहे. अशातच बीडमध्ये करण्यात आलेल्या बॅनरबाजीची चर्चा रंगतेय. कोविड काळात अहोरात्र काम करणाऱ्या नर्सेसच्या बाबतीत राज्य सरकार उदासीन आहे. अनेक समस्यांनी नर्सेस ग्रासले असताना देखील त्या समस्यांचे निराकरण करण्यात आलं नाही. त्यामुळे नर्स संघटनेकडनं अणुच्या पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आली आहे. नर्स संघटनेकडनं अणुच्या पद्धतीची बॅनरबाजी करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नर्सेस या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का? असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. आज अजित पवारांची जन सन्मान यात्रा बीड जिल्ह्यात आहे आणि त्याआधीच अशा पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.