ज्यांनी जीवन संपवलं ते.. विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांच्य कार्यकर्त्यांचे आभार मानले.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीची राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू कऱण्यात आली आहे. येत्या 12 जुलै रोजी राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांच्य कार्यकर्त्यांचे आभार मानले. माझ्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रेमामुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी मला काय साथ दिली. लोकसभेतील माझ्या पराभवानंतर काही जणांनी जीव दिला ते माझ्या जिव्हारी लागलं त्याचं मी समर्थन करत नाही. पण आज ते थोडं थांबले असते तर आज ते या जल्लोषात सहभागी झाले असते. मला मिळालेली संधी आणि जल्लोष ज्यांनी जीवन संपवल त्यांना समर्पित करते, असे पकंजा मुंडे म्हणाल्या.