अपघातानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे बीडमध्ये; क्रेनने हार घालत स्वागत
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अपघातातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागताचा हा व्हीडिओ पाहा...
बीड : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अपघातातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेत. त्यांचं गहिनीनाथ गडावर जंगी स्वागत करण्यात आलं. धनंजय मुंडे हे सहकुटुंब मुंबईहून गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी आले आहेत. यावेळी क्रेनच्या सहाय्याने हार घालत जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. गहिनीनाथ गडावर आमदार धनंजय मुंडे यांची पेढ्याने तुला करण्यात आली. मुंडेंना भेटण्यासाठी गहिनीनाथ गडावर कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. गहिनीनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे परळीच्या दिशेने जात आहेत.
Published on: Feb 12, 2023 01:35 PM
Latest Videos