जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु; बघा व्हिडीओ

जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु; बघा व्हिडीओ

| Updated on: Jun 24, 2024 | 1:10 PM

एटीएम मशीन फोडून त्यातून पैसे चोरण्याचे प्रकार बऱ्याच वेळा आपल्याला ऐकण्यात आलेत. पण बीडच्या धारूरमध्ये चोरट्यांकडून चक्क एटीएम मशीनच पळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी बीडमध्ये रात्रीच्या सुमारास एसबीआयचे एटीएम बंद होते याच दरम्यान चार चोरट्यांनी काय केला कारनामा...

एटीएममधून आपल्याला हवे तेव्हा पैसे काढता येतात. त्यामुळे आपल्याला आपल्या जवळ जास्त पैसे बाळगण्याची गरज नसते. मात्र आता चोरटयांना चक्क एटीएम मशीनची गरज भासत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएम मशीन फोडून त्यातून पैसे चोरण्याचे प्रकार बऱ्याच वेळा आपल्याला ऐकण्यात आलेत. पण बीडच्या धारूरमध्ये चोरट्यांकडून चक्क एटीएम मशीनच पळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी बीडमध्ये रात्रीच्या सुमारास एसबीआयचे एटीएम बंद होते याच दरम्यान चार चोरट्यांनी चक्क दोरखंड लावून जीपने बाहेर ओढून एटीएम मशीन पळून नेले. चेहऱ्यावर माकड टोपी आणि अंगात रेनकोट घालून चोरट्याने एटीएममध्ये प्रवेश केला होता. चोरट्यांची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान गेवराई परिसरात एटीएम मशीन आणि जीप पोलिसांना आढळून आली तर सर्व आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचा एक पथक रवाना करण्यात आले आहे.

Published on: Jun 24, 2024 01:08 PM