'फडणवीसजी... तुम्हाला सरपंचाच्या पोरांशी शपथ', संतोष देशमुखांच्या हत्येचे तीव्र पडसाद विधानसभेत

‘फडणवीसजी… तुम्हाला सरपंचाच्या पोरांशी शपथ’, संतोष देशमुखांच्या हत्येचे तीव्र पडसाद विधानसभेत

| Updated on: Dec 19, 2024 | 10:33 AM

मरणाच्या अंगावरही शहारे येतील इतक्या निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. त्यावरून चौकशीपूर्वी मंत्रिमंडळातून 'आका'ला बाहेर काढा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद सभागृहात उमटलेत. मरणाच्या अंगावरही शहारे येतील इतक्या निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. त्यावरून चौकशीपूर्वी मंत्रिमंडळातून ‘आका’ला बाहेर काढा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. बीड सरपंच हत्येप्रकरणी चौथा आरोपी विष्णु चाटेला ९ दिवसांनंतर अखेर अटक झाली आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तीन आरोपी फरार आहेत. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपीसह तीन जण फरार आहेत. तर विष्णु चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले हे अटकेत आहेत. तर तक्रारीनुसार ज्या पवनचक्की प्रकल्पाकडून दोन कोटींच्या खंडणीसाठी सरपंचाची हत्या करण्यात आली, असा संशय आहे त्याच २ कोटी खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णु चाटे हे आरोपी आहेत. विष्णु चाटे हा राष्ट्रवादीचा केज तालुक्याचा अध्यक्ष राहिला आहे. परभणी आणि केज या दोन घटनांबद्दल केजमध्ये सर्वपक्षीयांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि केजमध्ये संतोष देशमुखांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 19, 2024 10:33 AM