Walmik Karad : तुरूंगात कराडला मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर सत्य उघड, बीड कारागृह प्रशासनानं स्पष्टच सांगितलं..
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले ज्या बॅरेकमध्ये आहेत. त्याच्या बाजूच्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले आणि परळीतील महादेव गीते हा आरोपी आहेत. यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील सत्य काय हे जेल प्रशासनाने सांगितले आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची माहिती काही वेळापूर्वी समोर आली होती. मकोका कायद्यातंर्गत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर कारवाई करण्यात आली असून ते बीडच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांच्याकडून वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसा झालेल्या मारहाणीचं वृत्त बीड तुरुंग प्रशासनाकडून फेटाळण्यात आलं आहे. बीड तुरुंगातील टेलिफोनवरून फोन लावण्यावरून २ कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाला. या झालेल्या वादात सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचा कोणताही संबंध नाही. बीडच्या घटनेच्या वेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले तिथे नव्हते. दरम्यान, बीड तुरुंगात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जवळच्या पोलीस ठाण्यात तुरुंग प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याचे माहिती मिळत आहे. तर काही कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येण्याची कारवाई तातडीने होणार असल्याची माहिती बीड कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या मारहाणीचं वृत्त तुरुंग प्रशासनाकडून अशी माहिती देत फेटाळण्यात आलं आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे

वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने

रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम

चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
