बीड मतदारसंघात नेमकं घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आले होते. इतकंच नाहीतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने थेट व्हिडीओच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. यामध्ये मतदारांच्या बोटाला केवळ शाई लावली जातेय तर बटण दाबणारा व्यक्ती दुसराच असल्याचे दिसतंय.
गेल्या १३ मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. दरम्यान, या दिवशी परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आले होते. इतकंच नाहीतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने थेट व्हिडीओच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. यामध्ये मतदारांच्या बोटाला केवळ शाई लावली जातेय तर बटण दाबणारा व्यक्ती दुसराच असल्याचे दिसतंय. हा व्हिडीओ तुम्हीही जरा नीट पहा… ईव्हीएम मशीन जवळ निळा शर्ट घातलेला व्यक्ती ईव्हीएम मशीनचं बटण दाबतो. परळीमध्ये बूथ कशा प्रकारे कॅप्चरिंग करण्यात आलं हे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसतंय. बाजूला मतदारांची यादी घेऊन बसलेले कर्मचारी आहे . त्यांच्याबाजूलाच हा निळ्या शर्ट घातलेला व्यक्ती उभा आहे. बोटाला शाई लावून आलेला मतदार ईव्हीएम मशीन जवळ आपले मत देण्यासाठी जातो तेव्हा त्यांना परत पाठवल्याचे पाहायला मिळतंय.
Published on: May 24, 2024 10:11 PM
Latest Videos