पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ आश्वासनानंतर अपक्षाची माघार? बीड लोकसभेत ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल
रविकांत राठोड यांनी आपली उमेदवारी पकंजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मागे घेतल्याची चर्चा आहे. यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप बीड लोकसभा मतदारसंघात चांगलीच व्हायरल होतेय. बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना कोणतं दिलं आश्वासन? बघा नेमकं काय घडलंय बीड लोकसभा मतदारसंघात?
शरद पवार गटाची साथ सोडत अजित पवार गटात गेलेल्या रविकांत राठोड यांनी आपली उमेदवारी पकंजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मागे घेतल्याची चर्चा आहे. यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप बीड लोकसभा मतदारसंघात चांगलीच व्हायरल होतेय. बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांनी महामंडळीचं आश्वासन दिल्यानंतर बीडमध्ये अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. दोघांमधील संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल करून फसवणूक झाल्याची चर्चा रविकांत राठोड यांच्या समर्थकांमध्ये आहे. बीड लोकसभेत भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत आहे. त्यात बंजारा समाजाच्या रविकांत राठोड यांनी देखील अपक्ष अर्ज भरला होता. बीजमध्ये लाख दीड लाख मतं बंजारा समाजाची आहे. त्यामुळे रविकांत राठोड जितकी मतं घेतील तितका पंकजा मुंडेंना तोटा आहे. बघा नेमकं काय घडलंय बीड लोकसभा मतदारसंघात?