दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून…, मुख्यमंत्र्याचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंकजा मुंडे यांनी मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आमच्याकडे मोदी नावाचा सर्वात मोठा अणुबॉम्ब आहे. आमच्याकडचा अणुबॉम्ब घरात घुसून मारतो, असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंकजा मुंडे यांनी मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. इतंकच नाहीतर ४ जूननंतर विरोधकांची लंका खाक होणार आणि तुतारीची पिपाणी होणार असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरसभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ
Published on: May 08, 2024 11:48 AM
Latest Videos