Pankaja Munde FB Post : लोकसभेतील पराभवानंतर कार्यकर्त्याने स्वत:ला संपवलं, पंकजा हळहळल्या, म्हणाल्या...

Pankaja Munde FB Post : लोकसभेतील पराभवानंतर कार्यकर्त्याने स्वत:ला संपवलं, पंकजा हळहळल्या, म्हणाल्या…

| Updated on: Jun 09, 2024 | 6:15 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवांनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्याने पराभवामुळे आपलं जीवन संपवलं असल्याचे समोर आलं आहे. यामुळे बीड परिसरात शोककळा पसरली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केले बघा...

पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने लातूरमधील सचिन मुंडे या तरूणाने आपलं जीवन संपवलं. तर पंकजा मुंडेंच्या पराभवाने सचिन खचला आणि त्याने जीवन संपवल्याचा दावा या तरूणाच्या कुटुंबाने केला आहे. दरम्यान, मी लढत आहे, तुम्ही संयम ठेवा आणि सकारात्मकता दाखवा, एका कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. ‘स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही… मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा.. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी पराभव स्वीकारला आणि पचवला आहे. तुम्ही ही पचवा.’, असे पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे.

Published on: Jun 09, 2024 06:15 PM