कर्तव्यदक्ष आई… ११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
आई-वडिल या दोघांनाही लोकसभेची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे आई-बाप आपलं कर्तव्य बजावताना दिसताय. पती-पत्नी या दोघांना लोकसभा निवडणुकीची ड्युटी लागल्याने घरामध्ये या ११ महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी कोणीच नसल्याचे थेट बाळालाच नेलं कामाच्या ठिकाणी
देशासह राज्यात लोकसभा निवडणूक होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या १३ मे रोजी पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत ११ जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान, बीडमध्ये एक महिला कर्मचारी आपल्या बाळासह निवडणुकीच्या ड्युटीवर हजर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आई-वडिल या दोघांनाही लोकसभेची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे आई-बाप आपलं कर्तव्य बजावताना दिसताय. पती-पत्नी या दोघांना लोकसभा निवडणुकीची ड्युटी लागल्याने घरामध्ये या ११ महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी कोणीच नसल्याने आईने आपल्या बाळालाच डेट निवडणुकीच्या ड्युटीच्या ठिकाणी सोबत आणले आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असल्याने राष्ट्रीय कामांतर्गत माझ्या पत्नीसह मला निवडणूक ड्यूटी लावली. पण उन्हाचा त्रास होत असल्याचे हे बाळ राहत नसल्याने आमच्या दोघांपैकी एकाची ड्यूटी कॅन्सल करण्यात येणार असल्याची माहिती या चिमुकल्या बाळाच्या वडिलांनी दिली.