नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं नवं ट्विट अन् निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं नवं ट्विट अन् निवडणूक आयोगावर हल्लाबोल

| Updated on: May 19, 2024 | 2:28 PM

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार त्यापूर्वी मतदानासंदर्भात अनेक व्हिडीओ आणि व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखी एक ट्विट केले आहे. .... तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार त्यापूर्वी मतदानासंदर्भात अनेक व्हिडीओ आणि व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखी एक ट्विट केले आहे. बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न असे म्हणत रोहित पवारांनी ट्विट केले आहे. त्यांनी असे म्हटले, बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा #परळी_पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. #पंकजा_ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे #बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल. महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. #निवडणूक_आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया!, असे म्हणत रोहित पवारांनी आयोगावरही हल्लाबोल केला आहे.

Published on: May 19, 2024 02:26 PM