Walmik Karad : वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी

Walmik Karad : वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी

| Updated on: Jan 01, 2025 | 10:53 PM

कराडकडून दहशत पसरवण्याचे प्रयत्न होताहेत असा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय. तर वाल्मीक कराड हे गरीब राजकारणी असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय.

केज कोर्टाने वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. हत्या आणि खंडणी प्रकरणाचा कनेक्शन असल्याचा दावा सीआयडीने केलाय. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी मध्ये वाढ झाली आहे. हत्या खंडणीच्या प्रकरणाचा कनेक्शन असल्याचा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केला. तर राजकीय द्वेषापोटी वाल्मिक कराडवर आरोप असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला. वाल्मिक कराड दोन कोटींच्या खंडणीत आरोपी असल्याचं सीआयडीच्या वकिलांनी म्हटलंय. तर वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा आरोप असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला. वाल्मिक कराडचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय. तर वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता असल्याचं कराडच्या वकिलांनी म्हटलं. कराडकडून दहशत पसरवण्याचे प्रयत्न होताहेत असा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय. तर वाल्मिक कराड हे गरीब राजकारणी असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय.हत्येचा आरोपी घुले हा कराडच्या सांगण्यावरूनच काम करायचा असा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय. तर दोन कोटींच्या खंडणीचा आरोप आहे ते पैसे दिले का? ते आधी सांगावं असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय. तर घुलेच्या शोधासाठी कराडची कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केला. त्यावर कराड सरेंडर झालेत.

Published on: Jan 01, 2025 10:53 PM