Beed : राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेत, जयदत्त क्षीरसागरांची शेरोशायरीतून टीका

Beed : राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेत, जयदत्त क्षीरसागरांची शेरोशायरीतून टीका

| Updated on: Mar 29, 2022 | 10:19 AM

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि शिवसेना नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. यंदा राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला लागले असून त्यांनी शिवबंधन बांधलं आहे.

बीड : राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या (Shivasena) गळाला लागले असून त्यांनी शिवबंधन बांधलं आहे. गंगाधर घुमरे, फारूक पटेल, नितीन लोढा, अमर नाईकवाडे आणि बाबूशेठ लोढा, अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खरे आणि शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव उपस्थित होते. आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी धमक असले तर किमान स्वत:च्या गावात रस्ता आणून दाखवावा’, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे यांनी दिलंय. मतदारसंघातील वयोवृद्ध लोकांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार संदीप क्षीरसागर शिवीगाळ करत असल्याचा आरोपही नाईकवाडे यांनी केलाय. याचवेळी शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) यांनी शेरोशायरीतून संदीप क्षीरसागरांवर टीका केलीय. ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागरांवर निशाणा साधलाय.

Published on: Mar 29, 2022 10:19 AM