'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी...', संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट

‘दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी…’, संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट

| Updated on: Jan 02, 2025 | 2:41 PM

अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केला.

अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, ज्या दिवशी अजित पवार शनिवारी 16 तारेखला मस्साजोग येथे आले, त्यांच्या ताफ्यामध्ये कराडची गाडी होती. त्या गाडीत हा आरोपी होता, तो तिथे जाऊन सरेंडर होतो. याचा अर्थ काय? ताफ्यामधील आरोपी तिथे जाऊन सरेंडर होतो. मस्साजोगला ही गाडी होती. त्याच गाडीमधील आरोपी जाऊन शरणगती देतोय. गाडी कोणाच्या नावावर आहे? असा सवालही बजरंग सोनावणे यांनी केला. इतकंच नाहीतर परळीतून पुणे त्यानंतर गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मिक कराडचा प्रवास सुरु असताना पोलीस काय करत होते? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे. १५ तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर असल्याचे म्हणत असा आरोपही बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

Published on: Jan 02, 2025 02:41 PM