Santosh Deshmukha Case: 'ती' वेळ मिळती-जुळती, संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर

Santosh Deshmukha Case: ‘ती’ वेळ मिळती-जुळती, संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर

| Updated on: Jan 15, 2025 | 3:48 PM

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि विष्णु चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात संभाषणाची वेळ मिळती-जुळती आहे. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला एक महिन्याचा कालावधी उलटून गेलाय. दरम्यान, या प्रकरणात एसआयटीकडून तपास सुरू आहे. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि विष्णु चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात संभाषणाची वेळ मिळती-जुळती आहे. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. ज्यावेळी देशमुखांचं अपहरण झालं त्या दरम्यानच ९ डिसेंबरला दुपारी ३.२० ते ३.३० वाजेपर्यंत फोनवर दहा मिनिटं फोनवरून संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर कराडवरील गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात पोलिसांकडून सादर करण्यात आली आहे. कराडवर मकोका का लावला याच्या आधारासाठी ही गुन्ह्याची यादी सादर कऱण्यात आली आहे. तर वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली, अशीही माहिती एसआयटीकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने काही बाबी मांडल्या. बघा व्हिडीओ…

Published on: Jan 15, 2025 03:48 PM