Beed Santosh Deshmukh Case : बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले वय 26, कृष्णा शामराव आंधळे वय 30 वर्ष, सुधीर ज्ञानोबा सांगळे वय 23 वर्ष हे अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 23 दिवस पूर्ण झाले असून नव नवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्याप्रकरणातील काही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले वय 26, कृष्णा शामराव आंधळे वय 30 वर्ष, सुधीर ज्ञानोबा सांगळे वय 23 वर्ष हे अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतेय. अशातच पोलिसांकडून या बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांना फरार घोषीत करण्यात आलं आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच बक्षीसही देण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. नागरिकांना अवाहन करण्यात येते की, वरील आरोपींचे ठाव ठिकाण कोणास माहिती असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी संपर्क साधून आरोपीची माहिती कळवावी, माहिती देणाराचे नाव अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल आणि योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असं पोलिसांनी या पत्रकात म्हटलं आहे.