‘मला ‘त्यानं’ असं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की…’, सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली
देशमुखांना लाकडी काठी, पाईप, क्लच वायर, गॅस पाईपने दोन तास मारहाण केली अशी कबुली घुलेने दिलीये. मीच अपहरण करून हत्या केली पोलीस कोठडीमध्ये घुलेची ही कबुली आहे.
बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी चार महिन्यांनंतर आपला जबाब दिलाय. देशमुखांची क्रूर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली दिली. सुदर्शन घुलेच्या जबाबातील हत्येची दोन तासांची क्रूर कथा ऐकून तुमचाही संताप अनावर होईल. सरपंच संतोष देशमुखाला खाली उतरवून उघडं करून त्याला लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी दोन तास जबर मारहाण करत होतो. जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझे २ ते ३ वेळा बोलण झालं. विष्णूनं मला सांगितलं की, त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे. त्यावेळी प्रतिक घुलेनं पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुखच्या तोंडात लघवी केली. प्रतिक घुलेनेच पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली. आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निपचीत पडला होता. त्यानंतर सरपंच देशमुख याला दैठणा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
