Santosh Deshmukh Case : '... म्हणून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या', CID नं कोर्टात काय केला मोठा दावा?

Santosh Deshmukh Case : ‘… म्हणून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या’, CID नं कोर्टात काय केला मोठा दावा?

| Updated on: Jan 15, 2025 | 5:56 PM

आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावाबी सीआयडीकडून करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांची नेमकी हत्या का झाली? याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी सध्या वेगाने तपास सुरू आहे. सुदर्शन घुले याला 6 डिसेंबरला जी मारहाण झाली होती त्याचा बदला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या केली का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र यादरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली असल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात केला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावाबी सीआयडीकडून करण्यात आला आहे. तर या प्रकरणात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनादेखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याधीच स्पष्ट झालं आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत 2 कोटींची खंडणी मागितली असल्याचेही समोर आले होते.

Published on: Jan 15, 2025 05:51 PM