Santosh Deshmukh Case : बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना अखेर बेड्या
बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तर राजकीय वातावरण देखील तापलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असताना या नवे खुलासे समोर येत असताना मोठी बातमी समोर आली आहे. बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीआयडीकडून त्यांचा कसून शोध सुरु होता. सीआयडीचे वेगवेगळे पथक मुंबई, पुणे यांसह ठिकठिकाणी शोध घेत होते. आता याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली होती, असा आरोप सिद्धार्थ सोनावणेवर आहे.