देशमुखांच्या क्रूर हत्येचं शूटींग अन् फोटो ज्या मोबाईलमधून नराधमांनी केलं, त्याचा तपासणी अहवाल समोर
अंधार पडताच देशमुखांचा मृतदेह दैठण फाट्याजवळ फेकून स्कॉर्पिओ घेऊन वाशीच्या दिशेने पळून गेलो. वाशीत पोलिसांना पाहून आम्ही स्कॉर्पिओ सोडून पळ काढला, असा जबाब देखील काल आरोपींनी दिला.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना चित्रीकरण केलेल्या मोबाईलचा अहवाल आता समोर आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल तपासणीचा अहवाल टीव्ही ९ मराठीच्या हाती लागला आहे. या प्रकरणात तपास करणारे पोलीस उपधीक्षक अनिल गुजरांनी यांनी आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली आहे. तर दोन ओप्पो तर एक सॅमसंग कंपनीच्या मोबाईलता तपासणी अहवाल समोर आला आहे. या मोबाईल फोन मधून संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो आणि ऑडिओ कॉल तपासणीदरम्यान, समोर आले होते. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या चपलेचाही पंचनामा पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासमोर करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच अपहरण करून आरोपींनी संतोष देशमुखांना दोन तास मारहाण केली. दोन तासांच्या मारहाणीवेळी जयराम चाटच्या फोनवरून घुले या आरोपीचं विष्णू चाटेशी दोन ते तीन वेळा बोलणं झालं, असं देखील आरोपी घुले याने जबाबात सांगितले होतं. दरम्यान, संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी नेऊन टाकला तिथे पोलिसांना तपासणी करत असताना संतोष देशमुख यांच्या चपला देखील आढळून आल्या आहेत.