Santosh Deshmukh Case : बीडमधील सर्वात मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचवेळी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे यांना अटक करण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. मात्र आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना सरेंडर झाला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यापैकी दोन आरोपींना पकडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेतलं आहे तर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे यांना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना फरार होण्यासाठी मदत करण्यासाठी डॉ. वायबसेची मोठी भूमिका होती. बीड हत्येतील फरार आरोपींना मदत करणारा संशयित आता पोलिसांच्या ताब्यात आहे. यासह धारूरच्या कासारीतून डॉ. वायबसे याच्यासह दोन जण चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना फरार होण्यासाठी मदत केल्याचा संशय असल्याची सूत्रांची माहिती आहे.