Santosh Deshmukh Case : ‘…आणि सरपंचाला संपवलं’, वारंवार फोन करून संतोष देशमुखांना बोलवणारा कोण?
पवनचक्कीच्या वादानंतर मारहाणीची भिती वाटतेय. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, असं संतोष देशमुख ६ डिसेंबर रोजी वादानंतर म्हणाले होते, असा खुलासा संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी केलाय.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी माध्यमांसमोर आल्यात. ६ डिसेंबर रोजी पवनचक्की प्रकरणातून वाद झाल्यानंतर संतोष देशमुख हे लातूरला गेले होते. मात्र वारंवार त्यांना फोन करून गावाला बोलवलं असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. पवनचक्कीच्या वादानंतर मारहाणीची भिती वाटतेय. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, असं संतोष देशमुख ६ डिसेंबर रोजी वादानंतर म्हणाले होते, असा खुलासा संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी केलाय. ‘भांडण झाल्यापासून संतोष देशमुख अस्वस्थ होते. भांडणानंतर लातूर गेलो पण सारखे फोन येत असल्याने बीड मध्ये परत आलो, असं संतोष देशमुख म्हणाले’, असं वक्तव्य संतोष देशमुख यांच्या पत्नीने टीव्ही ९ मराठीशी बोलताना ही माहिती दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येला ६ डिसेंबरचा वाद कारणीभूत ठरला. मस्साजोगच्या हद्दीत अवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. आरोपी प्रतिक घुलेसह काही आरोपींनी प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदेंना दोन कोटींची खंडणी मागितली. वॉचमन अशोक सोनवणेंनाही मारहाण करण्यात आली. यांनंतर त्यांनी सरपंच देशमुखांकडे धाव घेतली आणि घुलेंसह काही जणांवर गुन्हा दाखल केला. याचाच राग म्हणून ९ डिसेंबरला म्हणजेच लातूरहून परतताच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यांना जबर मारहाण करून त्यांचा जीवच घेतला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…