Beed Murder Case : ‘तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती वाटतेय म्हणायचे…’, पत्नीच्या प्रतिक्रियेनंतर खळबळ
पवनचक्कीतील वादापासून भीती वाटतेय, असं संतोष देशमुख म्हणायचे, असं वक्तव्य संतोष देशमुख यांच्या पत्नीने टीव्ही ९ मराठीशी बोलताना ही माहिती दिली.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवनचक्कीतील वादापासून भीती वाटतेय, असं संतोष देशमुख म्हणायचे, असं वक्तव्य संतोष देशमुख यांच्या पत्नीने टीव्ही ९ मराठीशी बोलताना ही माहिती दिली. ‘भांडण झाल्यापासून संतोष देशमुख अस्वस्थ होते. भांडणानंतर लातूर गेलो पण सारखे फोन येत असल्याने बीड मध्ये परत आलो, असं संतोष देशमुख म्हणाले’, असंही संतोष देशमुख यांच्या पत्नीने सांगितले. तर मारहाण होईल याची भीती वाटतेय असं संतोष देशमुख म्हणायचे, अशी प्रतिक्रिया देखील संतोष देशमुख यांच्या पत्नीने दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधीच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली तर सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी मिळाल्यानंतर ते अस्वस्थ झालेले होते, असा जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीकडे दिला होता. त्यानंतर त्यांनी टीव्ही ९ मराठीलाही यासंदर्भात माहिती दिली.