विशाळगड प्रकरणावरून बजरंग सोनवणेंची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, तू माझा मालक नाही, जास्त बोलल्यास…
व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये संबंधित तरुणाला खासदार सोनवणे यांनी 'देशात कुठे काही घटना घडली, तर त्याला मी जबाबदार आहे का ? जिल्ह्यात काही घडलं तर मी बोलेन. मात्र बाहेर घडलेल्या घनटनेवरून मला जाब विचारणारे तुम्ही कोण ? तुम्ही माझे मालक नाहीत, कोणत्या विषयावर मी बोलायचे का नाही हे तुम्ही मला सांगणारे कोण ? माझे मी ठरवीन, मला जास्त बोलल्यास मी फोन कट करून टाकीन', अशा शब्दात बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिलंय.
अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली विशाळगड परिसरात असलेल्या गजापूर येथे घडलेल्या घटनेवरून मुस्लिम समाजात तीव्र रोष असल्याचे पाहायला मिळत आहे आणि याचाच सामना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना करावा लागलाय. एका मुस्लिम तरुणाने खासदार बजरंग सोनवणे यांना फोन करून, “विशाळगड घटनेचा तुम्ही साधा निषेधही व्यक्त केला नाही..आम्ही एकगठ्ठा तुम्हाला मतदान केलं “. असं म्हणत मुस्लिम तरुणाने खासदार बजरंग सोनवणेंना सवाल केला..तर यावर मला शिकवणारे तुम्ही कोण ? तुम्ही माझे मालक नाहीत, बोलायचे का नाही मी ठरवेन. असं म्हणत खासदार बजरंग सोनवणेंनी मुस्लिम तरुणाला उत्तर दिलंय आणि याच फोनवरील संभाषणाची कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या पात्रुड येथील एका तरुणाने, बजरंग सोनवणे यांना सेक्युलर विचाराचे म्हणून सबंध मुस्लिम समाजाने एकगठ्ठा मतदान दिले असल्याचा दावा केलाय. तर विशाळगड घटनेवरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून, संसदेचे सदस्य या नात्याने आपण साधा निषेधही व्यक्त केला नाही, असा जाबही विचारला आहे.
(टीव्ही ९ मराठीया कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही)