शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच निधन

शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच निधन

| Updated on: Dec 26, 2021 | 10:43 AM

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम व्हावी, तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर Sumant Ruikar) हे त्यांच्या मित्रांसह तिरुपती बालाजीकडे (Tirupati Balaji) पायी प्रवास करत निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.

बीड : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम व्हावी, तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर Sumant Ruikar) हे त्यांच्या मित्रांसह तिरुपती बालाजीकडे (Tirupati Balaji) पायी प्रवास करत निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्यानं कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. त्यांच्या निधनामुळं बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.