होळीनिमित्त जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा

| Updated on: Mar 18, 2022 | 1:26 PM

बीडच्या (Beed) केज तालुक्यातील विडा गावात जावयाला (Son in law) गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. या गावतील लोक  रंगपंचमी (Rangapachami) निमित्त जावई शोधून आणतात.

बीडच्या (Beed) केज तालुक्यातील विडा गावात जावयाला (Son in law) गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. या गावतील लोक  रंगपंचमी (Rangapachami) निमित्त जावई शोधून आणतात. यंदा हा मान तुळजापूरच्या जावयाला मिळाला आहे. मागच्या 100 वर्षांपासून धुलिवंदनाला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यंदा अमृतराजे धनंजय देशमुख या मिरवणुकीचे मानकरी ठरले आहेत. श्रीमंतराव देशमुख यांचे जावई असलेल्या अमृतराजे देशमुख यांना तरुणांनी गुरुवारीच ताब्यात घेतले होते. आज त्यांना गाढवावर बसवून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

Published on: Mar 18, 2022 01:26 PM
जळगावमध्ये युवा फाऊंडेशनच्या वतीने धुलीवंदन कार्यक्रमाचे आयोजन
आमदार Bhaskar Jadhav यांनी ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली