Shivneri Fort Bees Attack Video : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, सलग दुसऱ्या दिवशी काय घडलं?
शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवप्रेमींमध्ये शिवरायांच्या जयंतीनिमित्त मोठा उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरा करण्यासाठी काही शिवप्रेमी शिवनेरीवर जमलेले असताना १५ ते २० जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केल्याची घटना घडल्याने वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या पोळ्यातील मधमांशांना अज्ञातांनी डिवचल्याने मधमाशांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दरम्यान काल रविवारी (१६ मार्च) किल्ले शिवनेरी गडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. शिवजयंतीच्या तयारीसाठी रविवारी गडावर आलेल्या शिवभक्तांवर मधमाशांनी हल्ला केला होता. तर काल मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ४७ जण जखमी झाले होते. तर शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांच्या हातातील मशालीच्या धुरामुळे या मधमाशा सैरभैर झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली होती.