अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का; भगीरथ भालके BRS मध्ये जाणार; जाण्याआधी केली टीका

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का; भगीरथ भालके BRS मध्ये जाणार; जाण्याआधी केली टीका

| Updated on: Jun 25, 2023 | 5:22 PM

राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला होता. त्या चर्चांना आता मूर्त रूप आलं आहे. भालके यांनी आपण आता बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

सोलापूर : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात होते. येथील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला होता. त्या चर्चांना आता मूर्त रूप आलं आहे. भालके यांनी आपण आता बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र यावेळी त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपण फक्त आपला स्वाभिमानासाठी बीआरएसमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर ज्या स्व भारत नानांनी राष्ट्रवादी काँग्रेसला वाढवलं त्यांच्या परिवाराला पडत्या काळात पक्षाने आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पोरकं केलं. त्यांनी मायेची सावली दिली नाही असा आरोप केला आहे. नेहमीच पक्षातील नेत्यांनी आपल्याला दुय्यम वागणूक दिल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

Published on: Jun 25, 2023 05:22 PM