WITT Global Summit : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाचा मूड काय? देशातील सगळ्यात मोठ्या 'सत्ता संमेलना'तून होणार स्पष्ट

WITT Global Summit : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाचा मूड काय? देशातील सगळ्यात मोठ्या ‘सत्ता संमेलना’तून होणार स्पष्ट

| Updated on: Feb 27, 2024 | 11:47 AM

सताधाऱ्यांसह विरोधी नेते एकाच मंचावर येणार असून आजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाचा मूड काय आहे, हे देखील स्पष्ट होणार आहे. आज या विचार मंचावर देशातील नेत्यांची मांदियाळी असणार आहे.

नवी दिल्ली, २७ फेब्रवारी २०२४ :  आज TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशी ‘सत्ता संमेलन’ होत आहे. सोमवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यामुळे विरोधर याला काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सताधाऱ्यांसह विरोधी नेते एकाच मंचावर येणार असून आजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाचा मूड काय आहे, हे देखील स्पष्ट होणार आहे. आज या विचार मंचावर देशातील नेत्यांची मांदियाळी असणार आहे. सत्ता संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री अर्जून मुंडा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, बाबा रामदेव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पवन खेरा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय, भूपेंद्र यादव, पंजाबचे मुख्यंत्री भगवंत मान, मोहन यादव, मनोज सिन्हा हे सहभागी होतील.

Published on: Feb 27, 2024 11:47 AM