पोकळ घोषणांचा धूर… यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार? पूर्वसंध्येला विरोधकांची बॅनरबाजी काय?
हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन हे चांगलंच वादळी होणार असल्याची चिन्हं दिसताय.
नागपूर, ६ डिसेंबर २०२३ : राज्य विधिमंडळाचे ७ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. दरम्यान, हे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन हे चांगलंच वादळी होणार असल्याची चिन्हं दिसताय. बॅनरबाजीद्वारे विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. पोकळघोषणांचा धूर… असं बॅनरवर मोठं शीर्षक असून ड्रग्ज निर्मिती, प्रदूषण, आरोग्य यंत्रणा, महिला सुरक्षा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधकांनी बॅनरबाजीकरत या मुद्द्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसतेय. तर सेमीफायनल पर्यंत तुम्ही जिंकले पण फायनल मात्र आम्ही जिंकू अशा पद्धतीने चार राज्यात झालेल्या निवडणुकांमधील भाजपच्या विजयावर बॅनरमधून टोला लगवण्यात आला आहे. नागपूरातील रविभवन येथे महाविकास आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये सरकारवर निशाणा साधत वेगवेगळे विषय मांडण्यात आले आहे.