शिवजयंतीच्या आधी महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार, शपथविधीचा कार्यक्रमही ठरला
VIDEO | | शिवजयंतीआधी भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार?, बघा व्हिडीओ कधी होणार नव्या राज्यपालांचा शपथविधी
मुंबई, दिनेश दुखंडे, टिव्ही ९ मराठी : येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून त्यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार आहेत. तर १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होणार आहे. म्हणजेच १९ फेब्रुवारीपूर्वीच नवे राज्यपाल रमेश बैस यांचा महाराष्टाचे राज्यपाल म्हणून शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा रविवारी अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले आदी महापुरुषांचा अवमान कोश्यारी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील जनतेने चीड व्यक्त करत राज्यपालांचे पुतळे जाळले होते. ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलनेही होत होती. त्यामुळे राज्यपालांना अखेर पायउतार व्हावे लागले होते.