धनंजय मुंडे अन् पियुष गोयल यांच्या भेटीआधीच देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट, कांदाप्रश्नी महायुतीत श्रेयवाद?

धनंजय मुंडे अन् पियुष गोयल यांच्या भेटीआधीच देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट, कांदाप्रश्नी महायुतीत श्रेयवाद?

| Updated on: Aug 22, 2023 | 10:30 PM

VIDEO | कांद्याच्या प्रश्नासंदर्भात आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु, धनंजय मुंडे अन् पियुष गोयल यांच्या भेटीआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जपानवरून ट्वीट

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारने खरेदीची घोषणा केली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चाही श्रेयवादावरून रंगल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या भेटीआधीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून एक ट्वीट केलंय आणि कांद्याचा दर आणि कांद्याच्या खरेदीबाबत घोषणा केलीय. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली. मात्र या दोघांच्या घोषणे आधीच देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून ट्वीट करून केंद्राच्या निर्णयाची माहिती दिली. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Published on: Aug 22, 2023 10:30 PM