Belgaon Rain : बेळगावात अवकाळी पावसाचा तडाखा, अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू

| Updated on: Apr 20, 2022 | 12:12 PM

बेळगावात परिसरात मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच क्लब रोड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या विजय यल्लाप्पा कोल्हापूरे वय ६३ यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे कोल्हापूरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बेळगाव : शहर (City) परिसरात मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे (Rain) प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच क्लब रोड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या विजय यल्लाप्पा कोल्हापूरे वय 63 यांच्या अंगावर झाड (tree) कोसळल्यामुळे कोल्हापूरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बापट गल्ली येथे दुचाकीवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वीज तारांवर फांद्या कोसळल्यामुळे शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे शहराच्या सर्वच भागात लहान मोठ्या फांद्या पडल्याचे दिसून येत आहे.

Published on: Apr 20, 2022 12:12 PM
Tulajapur : तुळजाभवानी देवीचे खास ड्रोन शूट , चित्र पौर्णिमा विशेष
वाशिष्ठी आणि शीव नदीतील गाळ उपसायला सुरूवात, गाळ शासकीय जागेत टाकणार