अमरावती मध्ये पळस बहरला
शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला पळस (plas) वृक्ष आहे. पळस हा पानझडी वृक्ष फबेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव ब्युटीया मोनोस्पर्मा आहे.
शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला पळस (plas) वृक्ष आहे. पळस हा पानझडी वृक्ष फबेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव ब्युटीया मोनोस्पर्मा आहे. साधारणतः हा वृक्ष उत्तर भारतात आढळतो. महाराष्ट्रात(maharashtra) पानझडी वनांमध्ये पळस आढळतो.जानेवारी ते मार्च महिन्यात पळसाला केशरी लाल रंगाची फुले येतात.सद्या पळसाचे शोभिवंत झाड बहरले आहे. अमरावतीच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर बहरलेला पळस दिसून येतोय. पळस बहरल्याने तो सर्वाना आकर्षित करतो आहे. लहान मूल या पळसाच्या फुलाचा रंग म्हणून होळी सणाला या रंगाची उधळण करतात. आयुर्वेदात(ayurved) देखील पळसाच अधिक महत्व आहे.
Published on: Mar 11, 2022 12:10 PM
Latest Videos