BEST Bus | शेवटची नॉन एसी डबल डेकर BEST बस घेणार मुंबईकरांचा निरोप
VIDEO | जुनी डबल डेकर उद्यापासून रस्त्यावर दिसणार नाही तर सरसकट अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. मरोळ आगारात असलेल्या शेवटच्या बसला सजवण्यात आलं असून शेवटच्या दिवशी गाडीचं केलं औक्षण
मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | मुंबईची पारंपरिक असलेली डबल डेकर बेस्ट बस आज मुंबईकरांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे जुनी डबल डेकर उद्यापासून रस्त्यावर दिसणार नाही तर सरसकट अत्याधुनिक असलेली इलेक्ट्रिक बस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. मरोळ आगारात असलेल्या या शेवटच्या बसला सजवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर विशेष म्हणजे आज शेवटच्या दिवशी डबल डेकर बेस्ट बस गाडीचं औक्षण देखील करण्यात आले आहे. आज संध्याकाळी आगरकर चौक येथे या बेस्ट बसचा निरोप समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे. आजपासून डिझेलवर चालणारी डबल डेकर बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मुंबईच्या ताफ्यात फक्त जेमतेम सात डबल डेकर बस आहे. त्यापैकी ३ ओपन डेक आहेत. आजपासून डबलडेकर तर ५ ऑक्टोबरपासून ओपन डेक बंद केल्या जाणार आहेत.
Published on: Sep 15, 2023 02:52 PM
Latest Videos