Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Namdev Shashtri Video : '...हे 100 टक्के सांगू शकतो', भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी, महंत नामदेव शास्त्रींचं मोठं वक्तव्य

Namdev Shashtri Video : ‘…हे 100 टक्के सांगू शकतो’, भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठिशी, महंत नामदेव शास्त्रींचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 31, 2025 | 2:32 PM

' धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे.'

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर चर्चा सुरू आहे. अशातच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चारही बाजूंनी आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच नुकतीच DPDC ची बैठक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे हे लागलीच भगवानगडावर पोहोचले आणि ते मुक्कामी होते. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेत मुंडेंनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा केली. यानंतर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, ‘मंत्री धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाही. धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे भगवानगड भक्कमपणे उभा आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. पक्षाचे जे नेते आहेत त्यांना देखील याची जाणीव आहे. मात्र ज्या पद्घतीने सध्याचं राजकारण सुरू आहे. हा विषय इतका ताणला जातोय. पण कोणता विषय किती ताणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे’ तर पुढे ते असेही म्हणाले, ज्यावेळी घर फुटलं तेव्हा धनंजय मुंडेंनी खूप सोसलं आहे. आता उंच उडाण घेत असताना गेल्या ५३ दिवसात धनंजय मुंडेंची मानसिक अवस्था कशी आहे? ते भगवान गडावर आले असले तरी हातावर सलाईन आहे. किती सहन करावं एखाद्याने… असं म्हणत धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले.

Published on: Jan 31, 2025 02:32 PM