Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Namdev Shashtri Video : '...म्हणून धनंजय मुंडेंना आधार दिला', भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले

Namdev Shashtri Video : ‘…म्हणून धनंजय मुंडेंना आधार दिला’, भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले

| Updated on: Feb 01, 2025 | 12:02 PM

धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू असल्याचे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हटले. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच नामदेव शास्त्री यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ने संवाद साधला.

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे काल पाहायला मिळाले. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू असल्याचे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हटले. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच नामदेव शास्त्री यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल सविस्तर भाष्य केले. “धनंजय मुंडेंची अवस्था आणि त्यांची मानसिकता याला मी आधार दिला. मी त्यांना हे सांगितलं की माझा त्यांना पाठिंबा आहे. संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, यात जे कोणी आरोपी आहेत, त्यांना फाशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. यंत्रणा काम करते. न्यायालयीन व्यवस्था काम करतेय. यात नामदेव शास्त्री कुठे आहेत. मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही. मी वारकरी आहे. माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे तुम्हाला का वाटतं?” असा प्रश्न शास्त्रीनी केला. तर संतोष देशमुखांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहे. माणूस परत येत नाही हे सत्य आहे. त्यांना जेवढा खर्च लागेल, जितका निधी लागेल, त्यांच्या लग्नापर्यंत, त्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व खर्च भगवान गड उचलायला तयार आहे. अगोदर १५० विद्यार्थी आहेत अजून दोन विद्यार्थी वाढले तर काही फरक पडत नाही. भगवान गडाचे ते कर्तव्य आहे, असे नामदेव शास्त्रींनी म्हटले.

Published on: Feb 01, 2025 12:02 PM