लाच मागणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई, Bhagwant Mann यांचा मोठा निर्णय
भगवंत मान यांनी पंजाबमध्ये 23 मार्च रोजी शहीद दिवसाच्या निमित्तानं भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन क्रमांक जारी करणार असल्याचं म्हटलं आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केली आहे. आपनं भगवंत मान यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये 23 मार्च रोजी शहीद दिवसाच्या निमित्तानं भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन क्रमांक जारी करणार असल्याचं म्हटलं आहे. भगवंत मान यांनी 23 मार्चला शहीद दिवसाच्या निमित्तानं भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे, असं म्हटलंय. त्या हेल्पलाईनमध्ये माझा देखील मोबाईल क्रमांक असेल, असं मान यांनी स्पष्ट केलंय. पंजाबमध्ये जर कोणी तुम्हाला लाच मागितली तर त्यांना नकार देऊ नका, त्यांचं व्हिडीओ आणि ऑडिओ बनवून मला पाठवा, असं भगवंत मान यांनी म्हटलं. माझं कार्यालय त्या प्रकरणाची चौकशी करेल, असं देखील ते म्हणाले.
Latest Videos